Shekhar Gore (Photo Credits: FB)

सातारा (Satara) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे राजकारण आता चांगलेच चिघळत चालले आहे. TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, माण (Maan) तालुक्यातील शिवसेना नेते शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. माण तालुक्यातील पानवण येथील दोन जणांचे अपहरण करुन डांबून ठेवल्या प्रकरणी शेखर गोरे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटीच्या ठराव प्रकरणात अपहरण झाल्याची चर्चा रंगली आहे. शेखर गोरे यांच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून तणाव निर्माण झाला. या तणावातून हे अपहरण नाट्य घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.हेदेखील वाचा- Kolhapur Municipal Corporation Election 2021: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021 पुन्हा लांबणीवर, 'या' महिन्यात होऊ शकते निवडणूक

बँकेच्या निवडणुकीच्या ठरावानंतर डॉ.नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास सुरु असताना आणखी दोन अपहरणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. माण तालुक्यातील पानवन येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला. रविवारी रात्री उशीरा गुन्हयाची नोंद झाली आहे. डॉ.नानासाहेब शिंदेच्या गाडीची तोडफोड, अपहरण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून डॉ.नाना शिंदे यांच्या गाडीची तोडफोड करुन अपहरण करण्यात आलं होते. डॉ.नाना शिंदे हे पानवन गावच्या नवनिर्वाचित सरपंचांचे पती असल्याने राजकीय वादातून कृत्य झाले होते.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कुळकजाई विकास सेवा सोसायटीच्या ठराव प्रक्रियेदरम्यान 3 संचालकांना जबरदस्तीने गाडीत नेल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर गोरेंवर जानेवारी 2020 मध्ये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.