संजय राऊत (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी हालचालींना वेग आला असून सध्याचे राजकरण एका भलत्याच दिशेला जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप (BJP) असून सुद्धा त्यांनी सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) हा राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी सत्ता स्थापनासाठी हालचाली वाढवल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना कोणत्या वळवणावर जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. याच परिस्थितीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी...! याचाच अर्थ की शिवसेना आता लक्ष गाठण्यासाठी एका नव्या मार्गाने प्रयत्न करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री यंदा राज्यात दिसून येईल असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळेच भाजप सोबत मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाल्याने शिवसेनेना त्यांना पासून दूर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शिवसेना आता राष्ट्रवादी पक्षासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.(महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपा असमर्थ; महाआघाडी सोबत जायचे असल्यास शिवसेनेला शुभेच्छा: चंद्रकांत पाटील)

Sanjay Raut Tweet:

संजय राऊत यांनी हे ट्वीट केल्यानंतर शिवसेनेकडून अजून एक ट्वीट केले असल्याचे दिसून आले. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीमामा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी दिल्लीमधील खोट्या वातावरणात राहू शकत नाही त्यामुळेच पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आता शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अटी मान्य करणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला आमच्या सोबत सत्ता स्थापन करायची असल्यास केंद्रातील पदाचा राजीनामा देत भाजप सोबत युती तोडावी अशी अट घातली होती.