केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना राज्यातील मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अरविंद सावंत यांची राज्यातील संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष (Chairman of the Parliamentary Member Committee in Maharashtra) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, अरविंद सावंत यांनी याबद्दल आपल्या ट्विट हँडलवरून माहिती दिली आहे. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विशेष आभार मानले आहेत.
'आपण सोपविलेल्या या जबाबदारीस पूर्ण निष्ठेने पार पाडेल. तसेच महाविकासआघाडी सरकारच्या प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करील आणि सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या दारी महाराष्ट्राच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करील, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा - एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यास पुणे सत्र न्यायालयाची मंजुरी; 28 फेब्रुवारी दिवशी आरोपींना करणार हजर)
महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या कॅबिनेट मंत्री दर्जाच्या अध्यक्ष पदावर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे #महाराष्ट्रविकासआघाडी यांचे मन:पूर्वक आभार!
आज मा. उद्धवजींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/zg59DThvDH
— Arvind Sawant (@AGSawant) February 14, 2020
भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेचा सत्ता स्थापनेबाबत बोलणी झालेली असताना तशी बोलणी झालीच नाही, असे सांगून उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण होऊन विश्वासार्हतेला तडा गेला. त्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता अरविंद सावंत यांची राज्यातील संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी दिल्याने अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.