NIA Team In Pune | Photo Credits: Twitter/ANI

पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला मुंबईतील विशेष NIA कोर्टाकडे सुपूर्त करण्याची आता पूर्ण झाली आहे. पुणे कोर्टाने याला मंजुरी दिली आहे. हा निर्णय विशेष न्यायाधीश एस. आर नावंदर यांनी दिला आहे. सोबतच पुणे न्यायालयाने ना हरकत प्रमाणपत्रकही दिले आहे. एल्गार परिषद प्रकरणी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकारणाचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र अचानक यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करत तपास त्यांच्याकडे घेतला आहे. काही दिवसांपूर्वी NIAचं विशेष पथक पुण्यामध्ये पोहचलं होतं. त्यांनी कागदपत्राची मागणी केली. दरम्यान या बाबत एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांची नाराजी म्हणाले 'या विषयात राज्याने केंद्राला पाठिंबा देणे योग्य नाही'

महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीमा - कोरेगाव प्रकरणी एसआयटीची नेमणूक करण्यात यावी असे म्हटले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारत हा तपास एनआयएकडे यांच्याकडे सोपविला असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. आता याप्रकरणामध्ये 28 फेब्रुवारी दिवशी सार्‍या आरोपींना मुंबईच्या स्पेशल NIA कोर्टासमोर दाखल केले जाणार आहे.

ANI Tweet

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. परंतू या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून चार आठवड्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणं देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार उसळला होता. या परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी लावला आहे.