Devendra Fadnavis| Twitter

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत झालेली बंडाळी आणि त्यामधून निर्माण झालेले नवे सरकार याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' मधूनही या सत्तांतराच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागणं हा धक्कादायक क्लायमॅक्स असल्याचं म्हणण्यात आलं आहे. यावेळी भाजपावर हल्लाबोल करताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या, “छोटे मन से कोई बडा नही होता… टुटे मन से कोई खडा नही होता." या कवितेचाही संदर्भ देण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच सार्‍यांचा कयास होता पण या सत्तांतराच्या नाट्यामध्ये एकामागून एक धक्के बसत असताना सुरूवातीला आपण मंत्रिमंडळाबाहेर राहू अशी घोषणा केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश शिरोधार्य असं म्हणत मंत्रिमंडळात सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: पक्ष सोडून गेलेली व्यक्ती 'शिवसेनेचा मुख्यमंत्री' होऊ शकत नाही; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा.

सामनाच्या 'मोठे मन छोटे मन' अग्रलेखामध्ये भाजपाने कराराप्रमाणे अडीज वर्षांपूर्वीच शब्द पाळला असता तर 'मोठ्या मनाची' ढाल करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. लोकशाहीचं वस्त्रहरण करून अजून किती राजकीय नाट्याचे अंक पहावे लागणार हे बघावं लागत असं म्हणत शिवसेनेने पुन्हा भाजपावर हल्लाबोल केला आहे.