Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: File Photo)

केंद्र सरकारने काम करावे. बोलणे आणि डोलणे कमी करावे. दिल्लीच्या निवडणुकीत हे बोलणे आणि डोलणे दोन्ही अजिबात चालले नाही, असा टोला शिवसेनेने (Shiv Sena) सामना मुखपत्रातून (Saamna Editorial) केंद्र सरकारला (Central Government) लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी 16 फेब्रुवारी रोजी वाराणसी येथील कार्यक्रमात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि जम्मू-काश्मीरच्या 370 कलमाबाबतचे निर्णय रद्द करण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेने नरेंद्र मोदी यांना फक्त काम करत राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यावरून सत्ताधारी शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर टोला लगावला आहे. सरकारने काम करावे. बोलणे व डोलणे कमी करावे. दिल्लीच्या निवडणुकीत हे बोलणे व डोलणे होन्ही अजिबात चालले नाही. त्यामुळे प्रंतप्रधानांनी त्याचंयी बदलावी असा संदेश दिल्लीच्या निकालाने दिला. राष्ट्रहिताचे निर्णय सरकार घेते ही मेहरबानी नाही, पण एखाद्या विषयावर असहमती व्यक्त करणे म्हणजे देशद्रोही नाही, असे काल देशाच्या सर्वोच्चा न्यायालयाने बजावले आहे. तेव्हा राष्ट्रहिताचे निर्णय मागे घेणार नाही आणि त्यासाठी दबाव आले तरी झुकणार नाही, अशी भाषा निदान सरकारने करु नये. त्यामुळे टाळ्या मिळतात, पण मते दुसरीकडे वळतात हे दिल्लीत दिसले. वाराणशीत उद्या वेगळे काही घडले तर काय कराल? अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. हे देखील वाचा- बीड: पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप-मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; अंदोलनकर्ते अटकेत

सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून कोकण दौर्‍यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेत आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला

विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मात्र, आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.