बीड: पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप-मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; अंदोलनकर्ते अटकेत

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या घरासमोर अंदोलन केल्याने भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे एफआरपीचे बिल थकल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे पंकजा मुंडे यांच्या परळीतील यशश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची हाक दिली होती. परंतु, पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्या घराकडे धाव घेतली. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ता भडकले आणि दोघांत वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्यापासून मनसे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातीलपपरळीतील उसतोड मजूरांचे एफआरपीचे बिल थकल्यामुळे मनसेने अंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. पंकजा मुंडे या पन्नगेश्वर साखर कारखान्याचे संचालिका आहेत. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अंदोलनाची हाक दिली होती. परंतु, पंकजा मु्ंडे घरासमोर अंदोलन केल्याने मोठा वाद निर्माण होऊ शकतो, यासाठी पोलिसांनी मनसे परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नाकारल्याने मनसे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर धाव घेतली. यामुळे भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना भिडले. परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी होऊन वाद मिटवला आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली, अशी माहिती टीव्ही9ने दिली. हे देखील वाचा- 'तुमच्यात हिंमत असेल तर, पुन्हा निवडणूक लढू...' विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या झेंड्यात बदल करत हिदुत्वाचा भुमिका हाती घेतला होता. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. यामुळे भविष्यात भाजप-मनसे एकत्र येतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, नवी मुंबईत आयोजित भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर झाल्याचे दिसत आहे.