शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीसाठी दिल्ली मध्ये दाखल
Uddhav Thackeray in Delhi (Photo Credits-ANI)

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये एनडीएच्या  (NDA) सरकारला बहुमताने विजय मिळवता आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले जात आहे. तत्पूर्वी आज एनडीएच्या सरकारची दिल्ली (Delhi)  येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजप, शिवसेना नवनियुक्त खासदार उपस्थित राहणार आहेत. तर शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आता दिल्लीत बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेतील नवनियुक्त खासदार यांनी उपस्थिती या बैठकीसाठी लावली आहे. तर भाजप पक्षातील रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरोज पांडे ही मंडळीसुद्धा दिल्लीत दाखल झाली आहेत.(NDA: राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय समितीची आज दिल्लीत बैठक; राज्यातील शिवसेना, भाजप खासदार दिल्लीला रवाना; नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड होण्यीच शक्यता)

एनडीएच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे महत्त्वाचे नेते यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेतेही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याबाबत मोठी उत्सुकता आहे. तसेच, एनडीएतील घटक पक्षांना सत्तेत किती वाटा मिळणार याबाबतही उत्सुकता आहे.