पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये प्रभावशाली ठरणाऱ्या शिरोळ नगरपरिषदेसाठी पहिल्यांदाच मतदान पार पडले. अत्यंत चुरशीच्या अशा या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीही सुरु झाली असून, निकालही हाती यायला सुरुवात झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी ट्विट करुन दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गावडे शिरोळ नगरपरिषदेमध्ये विजयी झाले आहेत. उर्वरीत निकाल अद्याप हाती यायचा आहे. या निवडणुकीसाठी ७९.९२ टक्के इतके मतदान झाले होते. जिल्ह्यातील राजकारण बऱ्यापैकी शिरोळभोवती फिरत असल्यामुळे या निवडणुकीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान, या वेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या पदासाठी एकूण ६ उमेदवार मैदानात आहेत. तर, एकूण १७ जागांसाठी ८३ उमेदवार आठ प्रभागांतून नगरसेवक पदासाठी मतदारांचा कौल आजमावत आहेत.भाजप, बहुजन विकास आघाडी, शाहू आघाडी, ताराराणी आघाडी असे विविध पक्ष आणि आघाड्या मैदानात असून, मतदार राजा कोणाला कौल देतो याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, अपक्षांनीही मैदाना डाव लावल्याने नेमके काय होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. (हेही वाचा, शिरोळ नगरपरिषद निवडणूक: २१ ला मतदान, २२ ऑक्टोबरला मतमोजणी)
माझ्या खांद्याला खांदा देऊन चळवळीत लढा देणारे माझे मित्र पै. प्रकाश गावडे शिरोळ नगरपरिषदेमध्ये विजयी
— Raju Shetti (@rajushetti) October 22, 2018
दरम्यान, शाब्दिक बाचाबाचीचे काही प्रकार वगळता मतदान शांतते पार पडले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
पृथ्वीराज यादव (भाजप)
अमरसिंह पाटील (शाहू आघाडी)
प्रमोद नडगे (ताराराणी आघाडी)
रणजितसिंह पाटील (बहुजन विकास आघाडी)
महंमद गनी कागवाडे (अपक्ष)
शिवाजीराव संकपाळ (अपक्ष)