Shirdi Sai Baba Temple Reopen: शिर्डीतील साईबाबांचे मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास आजपासून परवानगी
Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in)

Shirdi Sai Baba Temple Reopen:  साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शिर्डीतील साई बाबांच्या मंदिरात आजापासून भक्तांना जाऊन दर्शन घेण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आतापर्यंत फक्त भाविकांना ऑनलाईन दर्शन दिले जात होते. पण दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मर्यादेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे.(Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका पुतळे, पिण्याच्या पाण्याचे कारंज्यांसाठी 1.9 कोटी रुपये करणार खर्च, मनपा अधिकाऱ्याने दिली माहिती)

खरंतर कोरोनाच्या स्थितीमुळे शिर्डीतील साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 7 ऑक्टोंबरला मंदिर सुरु केले गेले. तेव्हा फक्त प्रतिदिनी 15 हजार भक्तांना ऑनलाईनच्या माध्यमातून दर्शन घेण्यास परवानगी दिली होती. ऑनलाईन दर्शन होत असल्याने भाविकांना सुद्धा काही समस्या येत होत्या. मात्र आता आजपासून ऑफलाइन दर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे.

यापूर्वी दर्शनासाठी फक्त 15 हजार भाविकांना परवानगी दिली जात होती. मात्र याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. आता दररोज 25 हजार लोकांना साई बाबांचे दर्शन घेता येणार आहे. यामधील 15 हजार लोक ऑनलाईन आणि 10 हजार जणांना ऑफलाइन दर्शनाची मुभा असणार आहे. तर गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा खाली आहे. त्यामुळे भक्तांनी ऑफलाइन दर्शनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.