12 आमदारांच्या (MLA) विधान परिषदेवरील नियुक्तीच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचं दार ठोठावल मात्र आजच्या तारखेपर्यत राज्यात 12 आमदारांच्या नियुक्ती झालेली नाही. 12 आमदारांच्या नियुक्ती करण्याबाबतच्या शिफारशीला दीर्घकाळ लोटला असून आता राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती महाविकास आघाडी सरकारकडून (Maha Vikas Aghadi Government) करण्यात आली होती. आता अडीच वर्ष सरकार पूर्ण झालं, राज्यात सत्तातर झालं तरी अजुनही महाराष्ट्रात (Maharashtra) विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तींचा प्रश्न प्रलंबीत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) या मुद्द्यास पुर्णविराम दिला आहे कारण शिंदे सरकारकडून विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या मागे घेण्यात आली आहे.
राज्यातील नवं सरकार नव्या आमदारांची यादी पाठवणार असल्याची चर्चा आहे. या नावांवर लवकरच अंतिम निर्णय होणार असुन शिंदे-फडणवीस सरकार (Maha Vikas Aghadi Government) या 12 नावांची नवी यादी लवकरचं राज्यपालांकडे पाठवणार आहे. तरी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) दरम्यान अडीच वर्ष भिजत घोंगड असलेला मुद्दा आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये मार्गी लागणार का आणि लागलाचं तरी कधी सा प्रश्न उपस्थित होत आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला, महापालिका निवडणुकीत नवीन समीकरणाची चाहूल?)
राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi Government) सरकार असताना शिवसेनेकडून (Shiv Sena) उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar), चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi), विजय करंजकर (Vijay Karanjkar) आणि नितीन बानगुडे पाटील (Nitin Bangude Patil) यांची नाव सुचवण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse), राजू शेट्टी (Raju Shetty), यशपाल भिंगे (Yashpal Bhange) आणि आनंद शिंदे (Anand Shinde) यांचं नाव होतं तर काँग्रेसकडून (Congress) रजनी पाटील (Rajni Patil), सचिन सावंत (Sachin Sawant), मुझफ्फर हुसैन (Muzaffar Hussain) आणि अनिरुद्ध वनकर (Aniruddha Vankar) यांचं नाव देण्यात आलं होतं. तर यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. तर आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये कुणाच्या नावांचा समावेश असणार कुणाला अधिक जागा मिळणार शिंदे गट की भाजप या चर्चांना उधाण आलं आहे.