Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला, महापालिका निवडणुकीत नवीन समीकरणाची चाहूल?

राज्यभरात घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. अगदी सर्वसामान्यांपासून, राजकारणी (Politicians) ते सिनेअभिनेत्यांनी (Celebrities) आपल्या घरी गणरायाची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा (Happiness), ऐक्याचा (Unity) उत्सव. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांच्या घरी दर्शनास भेट देवून आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. राज्यातील राजकीय नेते गणेशोत्सवात अगदी लीन झालेले दिसत आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) गणेशोत्सवा (Ganeshotsav) निमित्त विविध स्पर्धांची, उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. राजकीय नेते मंडळी एकमेकांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जात भेटीगाठी घेताना दिसत आहे. यावर्षी केंद्र स्थानी दिसतोय तो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj  Thackeray)घरचा गणेशोत्सव. माध्यमांसह राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती राज ठाकरेंच्या घरच्या गणेशोत्सवाची.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल राज ठाकरे यांची निवास्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं. या शिंदे-ठाकरे भेटी नंतर राज्यातील  राजकीय चर्चांना उधाण आले. एका ठाकरेंचा हात सोडल्यानंतर दुसऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाळी देणार का अशी चर्चा होताना दिसली.काही दिवसांपूर्वीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राज्यात काही नवी समीकरण बघायला मिळतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.तसेच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) तालिमीत तयार झालेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेलं आहे. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022: यंदा विविध देशातील महावणिज्य दूतांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन, राज्य शासनाचा अनोखा उपक्रम)

 

काल आशिष कुलकर्णींच्या घरी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट झाल्यानंही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  तसेच देशाचे गृहमंत्री 5 सप्टेंबरला मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असुन या दौऱ्या दरम्यान ते राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तरी राजकीय वर्तुळातील या बाप्पाच्या दर्शनातील भेटीगाठीनंतर गणराया नेमका कुणाला पावणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे.