सोशल मीडियावर पत्नीचे फोटो शेअर करणे पडले महागात, पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
सोशल मिडिया (Photo Credits: PTI)

पत्नीचे (Wife) फोटो सोशल मीडियावर (Socail Media) शेअर केल्याप्रकरणी पतीविरोधात (Hasband) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दामपत्यांचा घटस्फोट ( Divorce) झाला असून पतीने दुसऱ्याच्या अकाऊंटवरुन सोशल मीडियावर पत्नीचा फोटो अपलोड केला आहे. आपली बदमान करण्याच्या पतीचा इरादा आहे, असा आरोप पत्नीकडून केला जात आहे. पोलिस या संदर्भातील अधिक माहिती गोळा करत आहेत. पत्नीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यामागे पतीचे काय उद्देश होते, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या हे प्रकरण साबयर क्राईम विभागाकडे (Cyber Crime Department) सोपवण्यात आले आहे. तसेच संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दामपत्यांचे १२ वर्षापूर्वा वयक्तिक कारणांमुळे घटस्फोट झाला होता. आता पती-पत्नी एकत्र राहत नसून पत्नी ही फारूखनगरमधील (Farukh Nagar) रहवासी आहे. सध्या पत्नी गुरुग्राममधील (Gurugram) कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात काम करत आहे. परंतु, सोशल मीडियावर पतीने आपले फोटो अपलोड केल्याचे पाहताच पत्नी संतापली आणि तिने स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली. महत्वाचे म्हणजे, पतीने आपली बदनामी करण्यासाठी दुसऱ्यांच्या अकांऊटवरुन तिचा फोटो अपलोड केला आहे, असा पत्नीने आरोप केला आहे. सध्या हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच संशयिताविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे-आश्चर्यम! एक वर्षात अनेक महिला तब्बल 8 वेळा प्रसूत; पोलीसही अवाक, SBI ने सुरु केला तपास

महिला पोलीस अधिकारी कविता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. सायबर क्राईम विभागाकडून आमच्याकडे ही तक्रार आली आहे. ते फोटो नक्की कोणी अपलोड केले होते, याचा तपास आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर अशा पद्धतीने फोटो अपलोड करण्यामागे नक्की काय कारण होते, याचाही शोध घेतला जात आहे.