भारतीय संसद (Parliament) आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना आरक्षण (Women Reservation) देण्याबाबत खुद्द संसद आणि प्रामुख्याने उत्तर भारत मानसिकदृष्ट्या अद्यापही अनुकूल नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पुणे डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या, लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची एक संयुक्त मुलाखत पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते.
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचे उद्दिष्ट असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ते म्हणाले, हे विधेयक अद्याप मंजूर होणे बाकी आहे. त्यावरूनच देश अजूनही मानसिकदृष्ट्या तयार नाही हे दिसून येते. महिला नेतृत्व स्वीकारायला हवे असेही ते म्हणाले. मी काँग्रेसचा लोकसभा सदस्य असल्यापासून या विषयावर संसदेत बोलत असल्याचे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, संसदेची 'मानसिकता' (Mentality) विशेषत: उत्तर भारताची (या मुद्द्यावर) अनुकूल राहिलेली नाही. मला आठवतं की मी काँग्रेस लोकसभा सदस्य असताना महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचो. संसदेत. माझे भाषण संपल्यानंतर मी मागे वळून पाहिले तर माझ्या पक्षाचे बहुसंख्य खासदार उठून निघून गेलेले असायचे. याचा अर्थ माझ्या पक्षातील लोकांनाही ते पचनी पडले नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्नशील राहावे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले. (हेही वाचा, Raj Thackeray Vidarbha Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून पाच दिवसांचा विदर्भ दौरा सुरु)
ट्विट
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यात आले होते. त्याला सुरुवातीला विरोध झाला, पण नंतर लोकांनी ते मान्य केले," असेही ते पुढे म्हणाले.