Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

महाराष्ट्र निवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (18 सप्टेंबर) विदर्भ (Raj Thackeray Vidarbh Daura) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पक्षबांधणीच्या उद्देशाने ते पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. पक्षस्थापनेपासून सुरुवातीचे काही यश वगळता मनसेला नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यातच पाठिमागील काही वर्षांमध्ये पक्षाचे अनेक महत्त्वाचे शिलेदार पक्ष सोडून गेले आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे यांना पक्ष पुन्हा सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अलिकडील काळात त्यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे. आजचा विदर्भ दौरा त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

नागपूर महापालिका निवडणुका (Nagpur Municipality Elections) तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे मुंबईहून रेल्वे प्रवास करत नागपूरला आले. ते नागपूरात दाखल झाले असून, कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आपल्या नेत्याचे स्वागत कले. दरम्यान, या वेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. (हेही वाचा, Navratri वरही राजकीय फीव्हर! मनसे कडून आयोजित रास दांडिया स्पर्धेत भन्नाट बक्षिसं; 50 खोके ते गुवाहाटी ट्रीपची संधी)

राज ठाकरे पुढचे पाच दिवस म्हणजेच 22 सप्टेंबर पर्यंत विदर्भात असणार आहेत. या काळात ते केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील इतरही विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. काही लोकांचे पक्षप्रवेशही पार पडतील असे सांगितले जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा म्हणून उल्लेख केला जातो आहे.या दौऱ्यादरम्यान, नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.