Sharad Pawar Total Assets According ADR : शरद पवार यांची एकूण संपत्ती किती? आयकर विभागाच्या नोटीशीनंतर चर्चेला उधान, पाहा काय सांगते एडीआर आकडेवारी
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Sharad Pawar Property: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून नुकतेच प्रसिद्ध झाले. शरद पवार यांनीही या नोटीशाला आपण लवकरच उत्तर देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांना नोटीस पाठविण्याचे कोणतेही निर्देश आपण आयकर विभागाला दिले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या सर्वांमुळे शरद पवार यांची एकूण संपत्ती (Sharad Pawar Total Assets ) किती? हा सवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकारण आणि उत्सुकता या दोन्ही गोष्टी यापाठीमागे दिसतात. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar Wealth) यांची एकूण संपत्ती किती याबाबत प्राप्त माहिती आम्ही येथे देत आहोत. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms) या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवर आधारीत आहे. एडीआर (ADR) ही संस्था देशभरातील निवडणुकांबाबत माहिती ठेवते. तसेच, उमेदवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दर्शवलेल्या संपत्तीबाबतची आकडेवारीही दर्शवते.

शरद पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून नुकतीच बिनविरोध निवड झाली. या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांनी त्यांच्या स्वत:च्या आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या संपत्तीचे विवरण दिले होते. जाणून घेऊया शरद पवार यांच्या संपत्तीबद्दल. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Wealth: अबब! सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडे 'एवढी' संपत्ती; विधान परिषद निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली माहिती)

स्थावर मालमत्ता (Real Estate)

एडीअरच्या आकडेवारीनुसार शरद पवार यांच्याकडे शेतजमीन आहे. ज्याची किंमत 1 कोटी 30 लाख 97 हजार 960 आहे. बिगरशेती जमनी 91 लाख 71 हजार 480 रुपये, व्यावसायिक इमारत 3 कोटी 12 लाख 50 हजार रुपये तर 2 कोटी 17 लाख 14 हजार 501 रुपये इतक्या किमतीची रहिवासी इमारत आहे, अशा प्रकारची शरद पवार यांची स्थावर मालमत्ता आहे.

जंगम मालमत्ता  (Movable Property)

शरद पवार यांच्याकडे 65,680 रुपये रोकड आणि विविध बँकांमध्ये विविध स्वरुपांमध्ये ठेवलेली अथवा गुंतवलेली 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये इतकी रक्कम आहे. याशिवाय 88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने आणि शेअर्स, बॉण्ड्सच्या रुपामध्ये गुंतवलेली रक्कम 7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपये अशा स्वरुपात जंगम मालमत्ता आहे.

कर्जाऊ दिलेली रक्कम (Loan Amount)

शरद पवार यांनी आपल्या संपत्तीतील काही रक्कम कर्ज म्हणूनही दिली आहे. पवार यांनी कर्ज म्हणून दिलेली रक्कम ही 7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये इतकी आहे. हे सर्व कर्ज वैयक्तिक कर्ज म्हणून देण्यात आले आहे.

शरद पवार यांच्यावर असलेले कर्ज

शरद पवार यांची गुंतवणूक, स्थावर आणि जंगम मालमत्ता यांतील रकमा मोठ्या असल्या तरी पवार यांच्यावर कर्जही आहे. शरद पवार यांच्यावर 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील पवार यांनी 50 लाख रुपये सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये हे सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतले आहेत. शरद पवार हे स्वत:चे वाहन वापरत नाहीत. त्यांच्या नावावर एकही गाडी नाही.

शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडूलकर, माधुरी दीक्षित यांसारख्या सेलिब्रेटी आणि राजकारणी मंडळींची संपत्ती किती असेल याबाबत नेहमीच चर्चा आणि उत्सुकता कायम असते.