Sharad Pawar | (File Image)

Sharad Pawar On One Country One Election: मराठा आरक्षण, जळगाव लाठीचार्ज (Jalgaon Lathicharge), एक देश एक निवडणूक या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. जळगाव शहरातील सागर पार्क येथे त्यांची आज (5 सप्टेंबर) जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते येथे पोहोचले असून तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. Maratha Reservation द्यायचे तर त्यासाठी आरक्षण मर्यादा 50% वाढविण्याची गरज आहे. मराठा समाजास ओबीसी (OBC) कोठ्यातून आरक्षण द्यावे अशी एक मागणी पुढे येत आहे. पण, तसे करणे योग्य होणार नाही. तो इतर समाजातील गोरगरीबांवर अन्याय ठरेल असेही ते या वेळी म्हणाले.

'एक देश एक निवडणूक' लक्ष विचलीत करण्यासठी

जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागीतलेली माफी म्हणजे एकप्रकारे दिलेली गुन्ह्याची कबुलीच आहे, असे म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीक केली. त्यासोबतच त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार 'एक देश एक निवडणूक' धोरण आणत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याचेही समजते. पण हा मुद्दा केवळ लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आहे. त्यापलीकडे त्याला काहीही महत्त्व नाही. परंतू, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मुळीच गरज नव्हती असेही ते म्हणाले.

'शासन आपल्या दारी' केवळ प्रसिद्धीसाठी

राज्य सरकार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा वापर प्रसिद्धीसाठी करते. तो वापर प्रसिद्धीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी करायला हवा. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको. राज्यातील पर्जन्यमान पाहता भीषण स्थिती आहे. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही. दुसऱ्या बाजूला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बाजारपेठच नाही. त्यामुळे राज्य सध्या चिंताजनक स्थिती आहे. त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभा ठाकले आहे, असेही पवार म्हणाले.

'इंडिया' आघाडीचे नाव बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही

दरम्यान, विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर केलेल्या 'इंडिया' आघाडीचे नाव बदलण्याची मागणी काही लोक करत आहेत. मात्र, ते नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही. आगोदर पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्या मग बाकीचे बोला. शिवाय पंतप्रधानांनीही वस्तुस्थिती सांगावी, अशा शब्दांत शरद पवार यांनी विरोधक आणि खास करुन अजित पवार यांना नाव न घेता टोला लगावला.