INDIA Alliance Mumbai Meeting: इंडिया आघाडीच्या बैठकीत 3 ठराव मंजूर;  शरद पवार, संजय राऊत सह 14 जणांची समन्वय कमिटीची घोषणा
India Alliance | Twitter

मुंबई (Mumbai) मध्ये आयोजित इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) तिसर्‍या बैठकीमध्ये आज 3 ठराव मंजूर झाले आहेत. सोबतच इंडिया आघाडी मध्ये समन्वय ठेवण्यासाठी 14 जणांची एक कमिटी घोषित करण्यात आली आहे. सध्या इंडिया आघाडीमध्ये 28 पक्षांचा समावेश आहे. त्यांच्यातील काही पक्षांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी या कमिटीचा भाग आहे. संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये या कमिटीतील सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर आदित्य ठाकरे यांनी मंजूर झालेले 3 ठराव वाचून दाखवले आहेत.

समन्वय कमिटीत कोण कोण?

केसी वेणूगोपाल

शरद पवार

एम के स्टॅलिन

संजय राऊत

तेजस्वी यादव

अभिषेक बॅनर्जी

राघव चड्डा

जावेद खान

ललन सिंग

हेमंत सोरेन

मेहबूबा मुफ्ती

डी राजा

ओमर अब्दुला यांच्या समावेश

पहा ट्वीट

मंजूर झालेले ठराव

  • जुडेगा भारत, जितेगा इंडिया या स्लोगनचा प्रादेशिक भाषेत प्रसार
  • शक्य तिथे लोकसभा निवडणुका एकत्र लढणार
  • जागावाटपासंदर्भात लवकरात लवकर सुरूवात करून प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार
  • येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन देशात रॅली काढल्या जातील.

( नक्की वाचा: I.N.D.I.A Alliance Meet Today: 'इंडिया आघाडी' बैठकीची भाजपकडून 'Ghamandia Meeting' म्हणत खिल्ली; 'मविआ' नेत्यांकडून प्रत्युत्तर).

दरम्यान या बैठकीमध्ये इंडियाचा लोगो जारी होणं अपेक्षित होतं परंतू सध्या हा लोगो अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मलिकार्जुन खर्गे यांनी बोलताना 'मोदी सरकार आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण आपण मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे. ज्यांना कोविड, मणिपूर हिंसाचारावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचं सूचलं नाही ते आता अचानक विशेष अधिवेशन बोलावत आहे. हा देश हुकूमशाही कडे जात आहे. आम्ही 'इंडिया' म्हणून सारे एकत्र येत ते होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत' असल्याचंही खर्गे म्हणाले आहेत.