सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवारच्या CBI चौकशीच्या मागणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया - 'पार्थ इमॅच्युअर, त्याच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही'
Sharad Pawar (Photo Credits: Getty)

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येवरून महाराष्ट्रात राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे. आता या आत्महत्येचे गुढ उकलण्यासाठी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्यामध्ये एनसीपी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू पार्थ पवार (Parth Pawar) यांनी देखील सीबीआय चौकशी व्हावी असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आज पार्थ हा इमॅच्युअर आहे त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची देखील किंमत नाही असं म्हणत फटकारलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती

दरम्यान सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचं प्रकरण हातळण्यासाठी मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस समर्थ आहे. कुणाचीही आत्महत्या हा वाईटच प्रकार आहे पण ज्याप्रकारे मीडिया त्याला हाताळत आहे. अनावश्यक चर्चा रंगत आहे त्याची गरज नसल्याचं मत शरद पवार यांनी म्हटलं आहे. पण कुणाला सीबीआय किंवा अन्य संस्थांकडून तपास करायचा असेल तर त्याला विरोध करण्याचा मला अधिकार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. Sushant Singh Rajput Case: राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी; पार्थ पवार यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी.  

शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थ पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दरम्यान काही दिवसांपासून सातत्याने पार्थ पवार यांची भूमिका शरद पवार आणि पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याने चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी पार्थने राम मंदिराच्या निर्माणाला देखील शुभेच्छा देणारे पत्र पाठवले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थची ती वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगत विषय संपवला होता.

मुंबईमध्ये चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये बैठक झाली आहे.