अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये सुशांत प्रकरणी तणाव निर्माण झाला आहे. त्याचसोबत शिवनेसा खासदार संजय राऊत यांनी सुशांतचे वडील दुसरे लग्न करणार होते म्हणून तो नाराज असल्याचे विधान केल्यानंतर पूर्णपणे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. संजय राऊत यांच्या या विधानामुळे बिहारमधील सत्ता ते महाराष्ट्रातील विरोधांकडून संताप व्यक्त करण्यात आला. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. या दोघांमधील बैठक वाय बी चव्हाण सेंटरला आयोजित करण्यात आली. यावर आता संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, होय मा. शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील व देशातील घडामोंडीवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही असे म्हटले आहे. त्याचसोबत बैठक पुर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना असे म्हटले आहे की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर पुर्ण विश्वास आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा विषय हा तितका महत्वाचा नाही.(Sushant Singh Rajput Death Case: गोपीनथ मुंडे, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा: शिवसेना)
होय ,
मा.शरद पवार यांना भेटलो.
महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांसदर्भातील विधानानंतर त्याचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार कुमार सिंह यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी केलेल्या या विधानावर 48 तासात माफी मागवी. अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करण्यात येईल. यावर राऊत यांनी असे म्हटले आहे की, अशा पद्धतीच्या हजारो केस रोज माझ्या ऑफिसात येतात. मी तथ्याच्या आधारवर म्हटले आहे. मी काही माफी मागणार नाही.
त्याचसोबत भाजपने मुंबई महापालिका आणि संयज राऊत यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली आहे. भाजप प्रवक्ते निखिल आनंद यांनी असे म्हटले आहे की, सीबीआयने तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी. कारण हे लोक गोष्टी निवडून निवडून लीक करत आहेत. निखिल यांनी पुढे असे ही म्हटले की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार गोंधळात पडली आहे.