Sushant Singh Rajput Case: राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु करावी; पार्थ पवार यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी
Parth Pawar And Anil Deshmukh (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार ( Parth Pawar) यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे. प्रख्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? अशा प्रशांची उत्तरे सध्या मुंबई पोलीस शोधत आहेत.

“सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले आहे. या ट्वीटमध्ये पार्थ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput case: कंगना रौनौत हिला समन्स, महेश भट्ट, करण जौहर यांच्या मॅनेजर्सची होणार चौकशी- अनिल देशमुख

पार्थ पवार यांचे ट्वीट-

सुशातच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 37 लोकांची चौकशी केल्याची समजत आहे. यात आदित्य चोपडा, संजय लीला भंसाली, रिया चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी करत आहेत. परंतु, सुशांतच्या आमहत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले होते.