Sharad Pawar On  Eknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? स्वत: शरद पवार यांनीच दिले संकेत, काय म्हणाले पाहा
Sharad Pawar, Eknath Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार? याबातब प्रसारमाध्यमांतून अनेकदा वृत्त येत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. परंतू आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनीच थेट प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नाचे थेट उत्तर शरद पवर यांनी दिले नाही. परंतू, काही संकेत मात्र निश्चित दिले. मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मनाबाद (Osmanabad) दौऱ्यावर होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर शरद पवार यांनी या वेळी शेलक्या शब्दांत टीकाही केली.

एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोदी पक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. त्या वेळी ते आम्हाला शिव्या घालत होते. परंतू, असे असले तरी त्यांचे काम, कर्तृत्व, नेतृत्व याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचे खानदेशातील स्थान मोठे आहे, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी या वेळी काढले. (हेही वाचा, Eknath Khadse: मी पक्षातून राजीनामा दिलेला नाही; भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची माहिती)

दरम्यान, आपण ज्या ठिकाणी, संघटनेत काम करतो त्या ठिकाणी आपल्या कामाची नोंद घेतली जात नाही, असे जर एखाद्याला वाटत असेल तर अशा वेळी संबंधित व्यक्ती आपली ज्या ठिकाणी नोंद घेतली जाईल त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो, अशी गुगलीही शरद पवार यांनी टाकली. शरद पवार यांच्या या विधानाचा अर्थ एकनाथ खडसेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करु शकतात, असा लावला जात आहे.