Eknath Khadse: मी पक्षातून राजीनामा दिलेला नाही; भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची माहिती
Eknath Khadse | (File Photo)

भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पक्षावर नाराज असून ते पक्ष सोडणार आहेत, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. तसेच ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. परंतु, एकनाथ खडसे यांनी स्वता: राजिनामा दिला नसल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे. एकनाथ खडसे 21 तारखेला मुलीसोबत मुंबईत येणार असून, ते काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते. एकनाथ खडसे यांच्या विधानाने भाजप समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकनाथ खडसे नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीत पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सविस्तर रंगली होती. मात्र, विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत मोठा भाजपला धक्का देतील, असेही बोलले जात होते. मात्र, एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्ष पूर्ण करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. हे देखील वाचा- Chandrakant Patil On Eknath Khadse: भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत; चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान

एएनआयचे ट्विट-

एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी राज्यात पक्षाचा अध्यक्ष असून मला कोणत्याही नेत्याचा राजिनामा मिळालेला नाही. तसेच मला विश्वास आहे की, आमचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.