Chandrakant Patil On Eknath Khadse: भाजप पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत; चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिले आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील, पण भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपचा कोणत्याही नेत्याचा राजीनामा मला मिळाला नसल्याचे ते म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांना पक्षाने सातत्याने डावलल्यामुळ ते नाराज असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. खडसे यांनी याबाबत अद्याप अधिकृत काही माहिती दिली नसली तरी त्यांच्या पक्षांतराची तयारी झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी राज्यात पक्षाचा अध्यक्ष असून मला कोणत्याही नेत्याचा राजिनामा मिळालेला नाही. तसेच मला विश्वास आहे की, आमचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आजच्या दिवशी शरद पवार यांनी भर पावसात गाजवली होती सातारा येथील सभा; पाहा संपूर्ण व्हिडिओ

एएनआयचे ट्वीट-

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी एका पत्रकार परिषदेत खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही केला. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले की, त्यांना राज्याचे कृषिमंत्रिपद मिळणार हे खडसेंच्या जवळील कार्यकर्ते अगदी छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र, शुक्रवारी दुपारी खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले होती की, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त प्रसारमाध्यमांनी ठरवले आहेत, असेही ते म्हणाले होते.