शरद पवार यांचा मोठा विजय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी होणार विराजमान
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी शरद पवार | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या (Mumbai Marathi Grantha Sangrahalaya) अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी आज (24 ऑक्टोबर) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद पवार यांचा विजय झाला. हाती आलेल्या निकालानुसार (Mumbai Marathi Grantha Sangrahalaya election Result ), एकूण 34 पैकी 31 जणांनी या निवडणुकीत मतदान केले. एकूण मतदानापैकी शरद पवार यांना 29 मतं मिळाली. शरद पवार यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या धनंजय शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक निकाल

विजयी उमेदवार

  • शरद पवार (अध्यक्ष)
  • विद्या चव्हाण
  • प्रभाकर नारकर
  • शशी प्रभू
  • माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत
  • प्रतीप कर्णिक
  • प्रभाकर नारकर
  • अमला नेवाळकर

पराभूत उमेदवार

संतोष कदम, रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे आणि सुधिर सावंत (हेही वाचा, Mumbai Marathi Grantha Sangrahalay Election: शरद पवार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार, पण मतदानाचा अधिकार नाही)

दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या धनंजय शिंदे यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गाने झाली नसल्याचा आरोप केला आहे. मतदानापूर्वीही त्यांनी हा आरोप केला होता. आम्ही आमचं मत निवडणूक अधिकाऱ्यासमोर मांडले तरीही त्यांनी निवडणूक घेतलीच. त्यामुळे या निवडणूक निकालाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत, असे शिंदे यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या किरण सोनवणे यांनी ही निवडणूक लोकशाही आणि कायदेशीर मार्गानेच झाल्याचे म्हटले आहे. जे या निवडणुकीबाबत असमाधानी आहेत त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू , या निवडणुकीत कोणताही गैरफ्रकार झाला नसल्याचे किरण सोनवने यांनी म्हटले आहे.