
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एका प्रमुख संस्थेच्या निवडणुकीत उतरले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय (Mumbai Marathi Granth Sangrahalaya) असे या संस्थेचे नाव आहे. शरद पवार या संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासह या निवडणुकीत उतरलेल्या 16 उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामळे विरोधक प्रश्न विचारत आहेत की, ही निवडणूक कोणत्या आधारावर घेतली जात आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात धनंजय शिंदे यांनी अर्ज भरला आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शरद पवार यांच्या विरोधात मैदानात असलेल्या धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे की, सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरु आहे. या दंडेलशाही विरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत, असेही धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेद्या विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावर धनंजय यांनी केलेल्या आरोपाचे खंडण केले आहे. शरद पवार यांच्यावर आरोप केले की प्रसिद्धी मिळते, हे काही लोकांना माहिती आहे. त्यामुळे हे लोक आरोप करतात, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
शरद पवार (अध्यक्ष पदाचे उमेदवार), एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे रिंगणातआहेत. दरम्यन, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे नाव वगळता इतर सदस्यांची नेमणकू शरद पवार यांच्या सूचनेनुसार 2017 पासून वादग्रस्तरित्या करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ही तक्रार अद्यापही प्रलंबीत आहे. शरद पवार यांच्या विरोधात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समिती कडून धनंजय शिंदे (अध्यक्ष पदाचे उमेदवार), डॉ संजय भिडे (उपाध्यक्ष पदाचे उमेदवार), प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम रिंगणात आहेत.