Sharad Pawar, Raj Thackeray, Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

Mahatma Gandhi Jayanti 2020: संपूर्ण जगाला असंहिसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण देणारे थोर महापुरुष महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती (Gandhi Jayanti 2020). हा दिवस आज संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या राष्ट्रपित्याच्या पुतळ्याला वा फोटोला हार घालून त्यांना आदरांजली वाहिली जाते. यंदा लॉकडाऊन आज गांधीजींच्या जयंती निमित्त होणारे मोठे कार्यक्रम करता येत नसले तरीही लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून या महापुरुषाला अभिवादन केले आहे. यात सामान्य जनतेसोबत राजकीय नेत्यांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.

'कोरोनाच्या या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन' असे ट्विट करत राज ठाकरे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. Gandhi Jayanti, Lal Bahadur Shastri Jayanti 2020 निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांचे ट्विटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत असे ट्विट करत या राष्ट्रपित्यास अभिवादन केले आहे.

तर देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छता, स्वदेशी, स्वावलंबनातून ज्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला त्या महात्मा गांधींना ट्विटच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.

पेशाने बॅरिस्टर असलेले महात्मा गांधी इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आले. इंग्रंजांविरूद्ध स्वातंत्र्याचा लढा देताना महात्मा गांधींजींनी जगाला 'अहिंसे'चा मार्ग दाखवला. अशा या महापुरुषास लेटेस्टली करुन कोटी कोटी प्रणाम!