राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाकिस्तानची प्रशंसा केल्याने शिवसेना पक्षाकडून टीका
शरद पवार, अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेसचे (| (Photo Credits- Facebook )

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाकिस्तानची (Pakistan) प्रशंसा केली आहे. तसेच पाकिस्तानात गेल्यावर माझे उत्तमरित्या स्वागत करण्यात आले. त्याचसोबत पाकिस्तान मधील नागरिक त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येऊ शकत नाहीत. परंतु भारतामधील नागरिकांना पाकिस्तानात गेले असता तेथील लोक नातेवाईकांप्रमाणे वागवतात असे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.

भारतामधील सत्ताधारी वर्ग केवळ राजकीय फायदा उलचण्यासाठी खोटी माहिती पसरवत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. तर पाकिस्तान येथील नागरिकांवर अन्याय केला जात असून ते नाखून असल्याचे वेळोवेळी सांगितले जाते. परंतु ही गोष्ट खोटी असून वास्तविकरित्या येथील स्थितीवर केली जाणारी विधाने फक्त राजकीय लाभासाठी करण्यात येत असल्याचे ही पवार यांनी म्हटले आहे.('छत्रपती' उपाधीचा मान ठेवा; उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट)

ANI Tweet:

त्यामुळे शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत कौतुक केल्याने शिवसेनेकडून जहरी टीका करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी यावर मत मांडले असून शरद पवार यांच्या पक्षातील नेतेमंडळी पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे पवार यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. तरीही पाकिस्तानचे कौतुक करणे हे योग्य आहे का असा प्रश्न कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तर पक्षातील नेतेमंडळींनी पक्ष सोडल्याने आता पाकिस्तान मधून कार्यकर्ते आयात करणार का असे म्हटले आहे.

तर शनिवारी राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे यांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सातारा येथे मोठा धक्का बसला असून पक्षातील गळती अद्याप थांबली नसल्याचे चित्र दिसून येत  आहेत. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी शरद पवार 17 सप्टेंबर पासून राज्यव्यापी दौऱ्यासाठी निघणार आहेत.