राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दुपारी 2 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहेत. ही भेट 'वर्षा' (Varsha) या मुख्यमंत्री निवासस्थानी झाली आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या या आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील ही आठवडाभरातील दुसरी भेट आहे. यापूर्वीची भेट 22 जुलैला झाली होती. दुपारी 2 च्या सुमारास शरद पवार वर्षावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: दरवाज्यावर उभे राहुन त्यांचे स्वागत केले. (हेही वाचा - Raj Thackeray Marathwada Tour: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने येत्या 4 ऑगस्टला मराठवाड्यापासून सुरु होणार राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; पहा तपशीलवार कार्यक्रम)
पाहा पोस्ट -
#WATCH | Mumbai: NCP-SCP chief Sharad Pawar meets Maharashtra CM Eknath Shinde at Varsha Bungalow over Maratha reservation and other issues.
(Video: CMO) pic.twitter.com/G9ghGsdfmz
— ANI (@ANI) August 3, 2024
खासदार शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा करण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागील भेटीत मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुढे आला होता. यावेळी दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देण्यावरही चर्चा झाली होती.
दरम्यान आज सकाळी पहिल्यांदा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह आधी विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.