मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत तातडीची बैठक; राज्यसभा सदस्याच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
Sharad Pawar (Photo Credits: IANS)

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (17 फेब्रुवारी, सोमवार) राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारचा कारभार तसंच राज्यातील इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांची नाराजी म्हणाले 'या विषयात राज्याने केंद्राला पाठिंबा देणे योग्य नाही')

तसंच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्बत होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी वकील परिषदेच्या समारोपानिमित्त नाशिकला गेलेले शरद पवार परिषदेला उपस्थित न राहता तातडीने मुंबईत दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपा, काँग्रेस समवेत इतर पक्षांचे 51 खासदार एप्रिल महिन्यात राज्यसभेतून सेवानिवृत्त होतील. भाजपला अजूनही राज्यसभेत बहुमत नसल्याने एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणूक भाजप पक्षासाठी महत्त्वाची आहे. राज्यसभेत सध्या 245 खासदार आहेत. खासदार निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राला 7 जागा मिळतील. (Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस)

राज्यातून 2 सदस्य राज्यसभेत जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात सत्ताधारी शिवसेनाचा एक आणि काँग्रेसचा एक खासदार राज्यसभेत पोहचेल, असे बोलले जात असले तरी केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला देखील एक जागा मिळण्याची आशा आहे.