Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections) पाहता अनेक इच्छुक पक्षांतर करत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाची साथ सोडत शिवसेना आणि भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधील अनेक मोठे नेते बाहेर पडणार आहेत. आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळच्या नात्यातील लोकंही त्यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांच्याबद्दलही प्रश्न विचारला शरद पवार भडकले असल्याचं समजले आहे.

श्रीरामपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार भडकले. एका पत्रकाराने शरद पवार यांना पद्मसिंह पाटील जे तुमच्या नात्यात असूनही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळालीआहे असा प्रश्न पत्रकाराने विचारताच शरद पवार भडकले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध असतो? तुम्ही चुकीचं बोलताय असे प्रश्न विचारायचे असतील तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला. मात्र उपस्थितांनी वेळ मारून नेत पवारांना शांत केलं.

विकासाची वाट धरून आम्ही राष्ट्रवादी सोडतो असे सांगत जे सोडून गेले त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की त्यांचा इतक्या वर्षांचा विकास हा राष्ट्रवादीमध्येच झाला आहे. आता युतीने त्यांना कोणत्या विकासाची वाट दाखवली आहे हे समजत नाही असं म्हणत शरद पवार यांनी म्हणत पक्ष सोडणार्‍यांना टोला लगावला आहे.