राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त (Sharad Pawar Birthday) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखल्या जाणार्या या ज्येष्ठ राजकारण्याला पंतप्रधानांकडून सोशल मीडियाद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना पंतप्रधानांनी एक्स पोस्ट द्वारा व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्या दीर्घकालीन राजकारणाचे कौतुक करतानाच दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन शरद पवारांना शुभेच्छा दिल्या, "श्री शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो." (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा)
वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. वयाच्या 27 व्या वर्षी आमदार झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि पुढे ते 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. गेल्या काही वर्षांमध्ये पवारांनी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. (हेही वाचा, Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार?)
राजकीय वर्तुळात 'चाणक्य' म्हणून ओळख
1999 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. शरद पवार यांनी राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तारिक अन्वर आणि पीए संगमा यांच्यासह त्यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. राजकीय वर्तुळात 'चाणक्य' म्हणून ओळखल्या जाणार्या, पवारांचा प्रभाव विरोधकावरही राहिला आहे. त्यांनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)
एक्स पोस्ट
My best wishes to Shri Sharad Pawar Ji on his birthday. May he be blessed with a long and healthy life. @PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
महाराष्ट्र पुढच्या वर्षी निवडणुकांकडे वाटचाल करत असताना, महाविकास आघाडीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अलीकडच्या काळात घडत असलेल्या विविध घडामोडींसह राजकीय गतिशीलता बदलू लागली आहे. राज्यात सुरुवातीला सत्तेवर आलेल्या मविआतील घटक पक्षांमध्ये फूट पडली. ज्यामुळे भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा समावेश असलेल्या महायुती आघाडीच्या अंतर्गत नवीन सरकार स्थापन झाले. त्या विरोधात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहेत.