sexual abuse representative image- photo credit - pixabay

Sexual Assault: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे काळजीवाहकानेच लैंगिक शोषण केले आहे. या धक्कादायक  घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत बुधवारी पीडित मुलींनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संशयित व्यक्ती आणि त्याला साथ देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पीडीत मुलींना पोलिसांच्या मदतीने बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे.

एरंडोल परिसरात या घटनेमुळे नागरिकांनी खळखळ व्यक्त केला आहे. गणेश शिवाजी पंडित असे या मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचे नाव उघडकीस आले आहे.खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वसतिगृह आहे. गेल्या महिन्यात हे वसतिगृह बंद पडल्यानंतर वसतिगृहात दाखल पाच मुलींना जळगाव येथील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आल्या. येथील वातावरणात स्थायिक  झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतिगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याबाबतची माहिती दिली.

या घटनेच्या संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आरोपी गणेश पंडित याला अटक केले आहे. त्याच्या सोबत त्याला साथ देणारी पत्नी आणि वसतिगृहाची अधीक्षक आणि सचिव यांनाही पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.  या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली.