Spa Center And Sex Racket | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

'वरुन किर्तन आतून तमाशा' ही म्हण आपल्याकडे पूर्वंपार चालत आली आहे. असाच काहीसा प्रकार पुणे येथील वानवडी (Wanwadi) परिसरात आढळून आला. पुणे पोलिसांनी (Pune Police) वानवडी परीसरात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वानवाडी येथील वारजे-माळवाडी परिसरात 'ओम स्पा सेंटर' या मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. मसाज पार्लरच्या (Spa Center) नावाखाली या ठिकाणी सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरु होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या प्रकाराची माहिती मिळताच कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. बोर्डावर मसाज सेंटर (Massage Centre) आणि आतमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती कारवाईनंतर पुढे आल्यावर परिसरात नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहराचाच एक भाग असलेल्या वानवडी पोलीस ठाणे हद्दीत फातिमानगर येथे 'क्लिओज स्पा अँड सलून' या मथळ्याचा बोर्ड असलेल्या एका दुकानात व्यवसाय सुरु होता. वरवर पाहता हे मसाज सेंटर असावे असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे नागरिकही प्रत्यक्ष दुकानात काय चालते याबाबत अनभिज्ञ होते. मात्र, पोलिसांना या घटनेची कुणकूण लागताच कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकत कारवाई केल्यानंतर या ठिकाणाहून पाच महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात श्रीधर मोहन साळुंखे (वय 42, पवळे चौक कसबा पेठ) नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वानवडी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरु आहे. (हेही वाचा, Sex Racket: पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून तीन महिलांची सुटका)

'क्लिओज स्पा अँड सलून' नामक मसाज सेंटरमध्ये महिलांची देहविक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खातरजमा केली आणि छापा टाकला. या वेळी पोलिसांनी घटास्थलावरुन पाच महिलांना ताब्यात घेत त्यांची सुटका केली. तर, स्पा मालक असलेल्या श्रीधर साळुंखे याला अटक केली. आरोप आहे की, स्पा सेंटर मालक श्रीधर साळुंखे हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करायला लावायचा.

दरम्यान, कोयता गँगमुळे पुणे शहर आगोदर राज्यभर चर्चेत आहे. कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. अशा वेळी शहरात इतरही काही अनधिकृत आणि बेकायदेशीर धंदे, व्यवसाय सुरु आहेत. तेही मोडीत काढण्यासाठी पोलीस सक्रीय झाले आहेत. त्यातूनच ही कारवाई झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळते आहे.