
पुणे (Pune Crime News) येथील वानवडी परिसरात असलेल्या ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीमध्ये एका मद्यधूंद तरुणीने (Drunk Girl) चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे वृत्त आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत केले जात असताना ही तरुणी नशेत तर्रर्र होती. तिने सोसायटीमध्ये गेट बंद करुन राडा घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
'राडेबाज तरुणी बड्या अधिकाऱ्याची मुलगी'
नशेच्या अंमलाखाली असलेली तरुणी कोणत्याही स्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचे स्वत;वर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, सोसायटीतील नागरिकांनी आरोप केला आहे की, सदर तरुणी ही बड्या अधिकाऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिला केवळ ताब्यात घेतले आणि सोडून दिले. तिच्यावर फारशी कारवाई करण्यात आली नाही. (हेही वाचा, Vardha Crime News: वर्ध्यात दारू पिण्यावरून दोन भांवडांत भांडण, काठीने मारून लहान भावाची निर्घृण हत्या, मोठ्या भावाला अटक)
धिंगाण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सोयायटीमधील रहीवाशांनी सुरुवातील तरुणीला राडा न करण्यासाठी विनंती केली. मात्र, सदर तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रहिवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला. तरुणी सोसायटी आवारात घालत असलेल्या धिंगाण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. तरुणीचा उद्दामपणा पाहून नागरिकही वैतागले होते. नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सरु असताना तरुणी अशा प्रकारचे वर्तन करु लागल्याने सोसायटीमधील नागरिकांची मोठीच गर्दी झाली होती. (हेही वाचा, Pune News: उसने पैसे परत मागितल्याने भावाकडून बेदम मारहाण, कंटाळून बहिणीची आत्महत्या)
सोसायटीतील रहिवासी नाराज
सोसायटीमधील नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताची घराघरांमध्ये तयारी सुरु असताना तरुणीने राडा घातला. त्यामुळे अनेकांना नववर्षाचे स्वागत करत असताना आयोजित करण्यात आलेल्या मेजनावणीमध्ये अडथळा आला, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, सदर तरुणीवर पोलीस काय कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे. शिवाय, सोसायटीमधील नागरिकांची कमेटीही तरुणीवर कोणती कारवाई करते का, याबाबत रहिवाशांना उत्सुकता आहे.
नशेबाजांचे अनियंत्रित वर्तन
31 डिसेंबर हा कोणत्याही वर्षातील शेवटचा दिवस असतो. त्यानंतर येतो तो 1 जानेवारी. त्यामुळे अनेक नागरिक हा क्षण मोठ्या आनंदाने साजरा करतात. यामध्ये काही लोक मेजवाणीचे आयोजन करतात. काही लोक मद्यपानही करतात. असे असले तरी काहींकडून मात्र मद्यपाण आणि इतर नशिल्या पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणावर होते. ज्यामुळे त्यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते आणि ते अनियंत्रित वर्तन करु लागतात. ज्यामध्ये शिवीगाळ, भांडण, लोकांच्या अंगावर धावून जाणे, अश्लील हावभाव करणे, पाहणाऱ्याच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करणे, असे विचित्र प्रकार हे लोक करत असतात. ज्याता इतरांना त्रास होतो. पुणे येथील तरुणीने घातलेला राडाही त्याच प्रकारात मोडणारा ठरतो.