Vardha Crime News: वर्ध्यात दारू पिण्यावरून दोन भांवडांत भांडण, काठीने मारून लहान भावाची निर्घृण हत्या, मोठ्या भावाला अटक

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एका भावाने दारूच्या वादावरून भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Vardha Crime News: वर्ध्यात दारू पिण्यावरून दोन भांवडांत भांडण, काठीने मारून लहान भावाची निर्घृण हत्या, मोठ्या भावाला अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Vardha Crime News: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एका भावाने दारूच्या वादावरून भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पार्टी सुरु असताना दारुच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही घटना घडली. विजय पांडुरंग मसराम (वय 35) असं या घटनेत गंभीर होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मोठा भाऊ गजानन पांडुरंग मसराम असं आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांमध्ये दारूवरून वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, एकाने जीव गमावला.दोघेही दारू पिण्यास एकत्र बसले होते. दारूवरून दोघांमध्ये वाद सुरु असताना गजाननला राग आला. वाद चालू असताना दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.  रागाच्या भरात गजानन याने विजयला जवळच असलेल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.या जीवघेण्या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला उपचारासाठी सेवाग्राम येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. खरांगणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सदाशिव ढाकणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश वैरागडे, विठ्ठल केंद्रे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

 

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2024 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).