
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणारे एकनाथ खडसे( Eknath Khadse) यांनी आता भाजप विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, खडसे हे त्यांच्या भाषणातून वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दिसत आहे. यातच जयंत पाटलांच्या संवाद यात्रेसाठी जळगावात आढावा बैठक घेतली असताना खडसेंनी भाजप आणि फडणवीसांना टोमणा मारला आहे. कार्यकर्त्यांना थोपवून धरण्यासाठी आपले सरकार येणार आहे, असे विरोधक सांगत राहतात. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टीकणार असून विरोधकांना केवळ 'मी पुन्हा येईन' हेच करत बसावे लागणार आहे, असे खडसे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ सुरु आहे. जयंत पाटलांच्या संवाद यात्रेसाठी एकनाथ खडसे यांनी जळगावात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावरही भाष्य केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होत आहे. राज्यात महाविकास आघाडी आपला पाय रोवत आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल, हे सरकार पडणार आहे, तरीही हे सरकार पाच वर्ष टीकणार आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना विविध पदांची अश्वासन दिली जात आहेत. तसेच कार्यकर्त्यांना थोपवून धरण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे विरोधक वारंवार बोलत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले आहे. पुढील पाच वर्षही अशी निघून जातील आणि त्यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येऊन हेच करत बसाव लागणार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Shiv Sena On Elgar Parishad: नाव 'एल्गार' पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या- शिवसेना
ट्विट-
#राष्ट्रवादी_परिवार_संवाद यात्रेच्या तयारीनिमित्त आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यात सहभागी झालो आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. @NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ofTbRlHK9b
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 3, 2021
दरम्यान, लोकसत्ताच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले होते. तसेच “मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न नक्कीच होते. आम्ही आव्हान देणारे आणि आव्हान स्वीकारणारे आहोत. जबाबदारीपासून पळणारे नाही” असेही उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले आहे.