CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री आणि वर्षा निवासस्थानावरुन महाराष्ट्राच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री आज पूर्व विदर्भाच्या (Vidarbha Tour) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे पुढील कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हे पाहताच उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी गोसीखुर्द धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हे पाहताच स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला आणि त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, गेल्या 35 वर्षापासून शेतीला पाणी मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हे देखील वाचा- Chhatrapati Sambhaji Maharaj Airport: औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र

युट्यूब व्हिडिओ-

 

उद्धव ठाकरे यांनी 10 डिसेंबर रोजी सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा दौरा केला. रत्नागिरी येथे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी उद्धव ठाकरे केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.