Security in Nagpur | X @ANI

नागपूर (Nagpur)  मध्ये 17 मार्चला झालेल्या हिंसाचारानंतर आज शुक्रवार च्या नमाज च्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन अलर्ट मोड वर आहे. अनेक मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. अजूनही काही भागात तणावग्रस्त स्थिती असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंसाचार झालेल्या मध्य नगपूर भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी कायम आहे. मात्र नागपूर मध्ये दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली असून काही भागात 4 तास शिथिलता देण्यात आली आहे.

सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. या निमित्ताने अनेकजण रोजा ठेवतात. रमजान महिन्यातील आज तिसरी शुक्रवारी अर्थात 'जुमे की नमाज' होणार आहे.

नागपूर मध्ये आज चोख सुरक्षा व्यवस्था

17 मार्चच्या नागपूर मधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 12 FIRs दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार सायबर पोलिस आणि 8 लोकल पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आले. आतापर्यंत यामध्ये 100 जणांना अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची काही हिंदू संघटनांची मागणी आहे.त्यामधून काही अफवांनी नागपूर पेटलं. या हिंसाचारानंतर बरेलीच्या एका मौलानांनी 'छावा'चित्रपटात औरंगजेब याला हिंदू विरोधी असल्याचे दाखवत हिंदू युवकांना भडकवण्याचे काम करण्यात आले आहे. हा सिनेमा हिंसाचाराला कारणीभूत आहे आणि त्यामुळे चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.