Maharashtra: वर्सोवाच्या खाडीत पडलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध दुसऱ्या दिवशी सुद्धा घेतला जात असल्याचे ठाणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद येथे राहणारा संदीप खरात आणि उल्हासनगर मधील अल्पवयीन मुलगी रेल्वेरुळावरुन चालत होते. परंतु पाय घसरुन ते खाली खाडीत पडले. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी माजी पोलीस भाऊसाहेब अहिर यांनी उडी मारली.(Mumbai Crime: मुंबई पोलिसांना मिळालं मोठं यश, 15 दिवसांत 8 कोटींच्या सोन्याच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल, 10 जणांना अटक)
पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या टीमने आणि काही कोळी बांधवांनी मुलीचा शोध घेताना मुलाचा जीव वाचवला. गुरुवारी मुलीच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्याआधीच खाडीत पडली होती.(Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक)
दरम्यान काही दिवसांपूर्वीच, ठाणे कळवा खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाची महिती मिळताच कळवा पोलिस आणि अग्निशमन दल एक बचाव वाहन, एक आपत्कालीन टेंडर आणि एक श्रवण व्हॅनसह घटनास्थळी उपस्थित झाले होते. मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ADR गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनकडून अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहचा तपास सुरू केला होता.