राज्य परिवहन महामंडळ (Msrtc) अनेक प्रयत्न आणि उपाययोजना करत असतानाही, शिवशाही बस (Shivshahi Bus) अपघात थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या अपघातानंतर शिवशाही (Shivshahi) बसला आज (सोमवार, 9 डिसेंब 2019) पुन्हा एकदा अपघात झाला. ही घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील पसरणी (Pasarni Ghat) घाटात घडली. यात 33 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. एका ट्राव्हल्सने धडक दिल्याने शिवशाही बसचा अपघात झाल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, MH-06-BW-3575 क्रमांकाची शिवशाही बस वाई बस स्थानकावरुन महाबळेश्वला निघाली होती. दरम्यान, पसरणी घाट रस्त्यावर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या एका MH-11-L-5999 क्रमांकाच्या ट्राव्हल्सने शिवशाहीला धडक दिली. या अपघातात शिवशाही बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. तर, ट्राव्हल्सही रस्त्यावरच पलटी झाली. या घटनेमुळे घाट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली. तसेच, बघ्यांचीही गर्दी जमली. (हेही वाचा, ST च्या शिवशाही AC Sleeper बसच्या तिकीट दरात कपात; 13 फेब्रुवारीपासून लागू होणार नवे दर)
ट्विटर
#Maharashtra Road Accident: #BusesClash Between Wai and #Mahabaleshwar, 10 Passengers Injured#shivshaibus #roadaccident pic.twitter.com/eIg1ldTTgM
— Manoj Pandey (@PManoj222) December 9, 2019
दरम्यान, वाई पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाणे निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत बसचे आणि ट्राव्हल्सचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले.