राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा महाराष्ट्रातील बालेकिल्ला म्हणजे सातारा (Satara) मतदारसंघ , मात्र खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशानंतर आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून सुटतो कि काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत, या दरम्यान नव्याने भाजपात सामील झालेल्या उदयनराजे यांनी एक मोठे विधान केले आहे, 'शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मला नितांत आदर होता, आहे आणि राहील. साताऱ्यातून जर का ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाही,' अशी उदयनराजे यांनी ग्वाही दिली आहे.
आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीसोबतच साताऱ्याची पोट निवडणूक सुद्धा 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.याच पार्श्वभूमीवर काही वृत्त वाहिन्यांना मुलखात देताना उदयनराजे भावुक झाले होते. आज महाळ आहे. पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे, माझ्या पूर्वजानंतर मला पवार साहेबच सर्वकाही आहेत. असे उदयनराजे यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर जर का पवार साहेब निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचा 5 लाख 79 हजार 26 मते मिळवून विजय झाला होता. असं असलं तरी, यंदा पहिल्यांदाच उदयनराजे यांच्या मताच्या पारड्यात अडीच लाखांची घेत झाली होती त्यामुळे विजयानंतर सुद्धा सेलिब्रेशन झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली होती माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नवे चर्चेत होती, मात्र आता उदयनराजे यांच्या विधानानंतर स्वतः शरद पवारच निवडणुकीत उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.