उदयनराजे भोसले (Photo Credot : Youtube)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून बाहेर पडल्यानंतर उदयन राजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूकीची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसोबतच सातरा लोकससभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा या विधानसभा निवडणूका आणि इतर राज्यातील पोटनिवडणूकांच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केल्या मात्र त्यामध्ये सातारा लोकसभा पोट निवडणूक तारिख टाळण्यात आली होती मात्र आता या निवडणूकीच्या तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Dates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‌तारखा जाहीर; 21 ऑक्टोबर ला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक मतदान 21ऑक्टोबर दिवशी होणार आहे. त्यामुळे साताऱ्यातील पोटनिवडणुकही याच दिवशी व्हावी, अशी अट उदयनराजे यांनी भाजपा पक्षप्रवेशावेळी ठेवली होती. याशिवाय, पोटनिवडणुकीत दगाफटका झाल्यास राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासनही उदयनराजे यांनी भाजपकडून घेतले असल्याचे वृत्त होते. मात्र आता राजेंच्या इच्छेनुसार राज्यात विधानसभा आणि सातारा लोकसभा पोटनिवडणूक एकाच दिवशी होणार आहे. 'छत्रपती' उपाधीचा मान ठेवा; उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट

सहा महिन्यांपूर्वी सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्र वादीचे उदयन राजे भोसले निवडून आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाला. आता उदयन राजे विरूद्ध निवडणूकीच्या मैदानात कोण उतरणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी हे वृत्त फेटाळले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार श्रीनिवास पाटील  विरूद्ध उदयन राजे अशी लढत होण्याची शक्यता आहे.