स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करुन उकळत्या चुन्यात ढकलण्यात आले आहे. सातारा शहरातील (Satara Crime) रविवार पेठ परीसरात ही घटना घडली. उकळत्या चुन्याचे (Lime) चटके बसून तरुण गंभीररित्या भाजला आहे. समाधान मोरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी समाधानला मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात प्राप्त तक्रारीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी अत्यंत किरकोळ कारणावरुन समाधान मोरे यास मारहाण केली. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकलले. त्यामुळे चुन्याचे चटके बसून समाधानचे शरीर अनेक ठिकाणी गंभीररीत्या भाजले आहे. त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Jalgaon: तरुणीचा दबाव, तरुणाची आत्महत्या, लग्नासाठी तगादा लावल्याने टोकाचे पाऊल)
दरम्यान, सातारा शहर पोरिसानी घडल्या प्रकाराबद्दल प्राप्त तक्रारीवरुन नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, संशयीत ओरपींनी हे कृत्य केले तेव्हा ते मध्यधुंद अवस्थेत होते. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.