सातारा येथे केंजळगडावर चढाई करण्यास गेलेल्या 10 वर्षाच्या मुलगा 200 फूट दरीत कोसळल्याने गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या केंजळगडावर चढाई करण्यास गेलेल्या एका 10 वर्षीय मुलगा दरीत कोसळला. मयंक असे मुलाचे नाव असून दरीत कोसळल्यानंतर त्याला तेथील ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या मुलासोबत आणखी काहीजण ही गड चढण्यासाठी गेले होते.(Nagpur: अशक्य ते शक्य करतील गावकरी! बोअरवेलमध्ये पडलेल्या बाळाला जीवदान, नागपूर जिल्ह्यातील शिवनी भोंडकी येथील घटना)

मयंक याच्यासोबत आणखी 7-8 जण ट्रेकिंगसाठी केंजळगडावर गेले होते. सकाळी 7 वाजता ट्रेकिंगला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सकाळीच 9 वाजण्याच्या काही वेळ आधी मयंक हा पुढे चालत असताना तो अचानक 200 फूट खोल दरीत कोसळला गेल्या. यामध्ये मयंक याला गंभीर जखमा सुद्धा झाल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai Rains: भांडुप मधील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या 2 महिला; Viral Video नंतर BMC ने तात्काळ उचलले पाऊल)

तर पावसाचा जोर सुद्धा काहीसा वाढलेला होता. तर पावसामुळे खालील माती ओली झाल्याने मयंक याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. सुदैवाने तो एका झाडाला अडकून पडल्याने त्याचा जीव वाचला पण गंभीर जखमी झाला.  सुरुवातीला तो जेव्हा दरीत कोसळला तेव्हा त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी तो त्यांना भेटला नाही. शेवटी तेथील स्थानिकांच्या मदतीने पुन्हा एकदा शोध घेतला असता तो एका झाडाला अडकलेला दिसून आल्याने त्याला बाहेर काढण्यात आले. प्रथम त्याला वाई मध्ये प्राथमिक उपचार दिले गेले.