सरकारी नोकरी| Photo Credits: File Photo

Malegaon Mahanagarpalika Bharti 2019:  मालेगाव महानगरपालिकेमध्ये आता तरूण-तरूणींसाठी मानधन तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही एक मोठी संधी आहे. थेट मुलाखतीच्या मधून डिसेंबर 2019 मध्ये यासाठी मुलाखती होणार असून स्टाफ नर्स, पशूवैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, वॉचमन ते जे.सी.बी चालक अशा विविध पदांवर सुमारे 791 लोकांची मानधन तत्त्वावर भरती होणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता निकष वेगळे आहेत. Sarkari Naukri: रेल्वेमध्ये 10वी पास, ITI केलेल्यांना नोकरीची संधी; 8 डिसेंबर पर्यंत करू शकता अर्ज

 

मालेगाव महानगर पालिका नोकर भरती

थेट मुलाखत: 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14 & 16 डिसेंबर 2019

मुलाखत व नोकरीचं ठिकाण: मालेगाव महानगरपालिका

वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष

मुलाखतीचं स्वरूप : वॉक इन इंटरव्ह्यू

कोणत्या पदावर होणार किती भरती?

  1. स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ 12
  2.  मिश्रक 06
  3. शस्त्रक्रियागृह सहाय्यक 02
  4. पशु वैद्यकीय अधिकारी 01
  5. स्वच्छता निरीक्षक 15
  6.  वाहनचालक 72
  7.  JCB चालक 03
  8. व्हाॅल्व्हमॅन 65
  9. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 15
  10.  कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 03
  11.  गाळणी निरीक्षक 02
  12. मजूर 50
  13. बीट मुकादम 16
  14.  वॉचमन /शिपाई 75
  15.  लिपिक टंकलेखक 80
  16.  इलेक्ट्रिक पंप चालक 08
  17.  सुरक्षा अधिकारी 01
  18.  अग्निशमन विमोचक 40
  19.  कामगार 325

दरम्यान मालेगाव महानगर पालिकेमध्ये होणारी ही नोकरभरती केवळ सहा महिन्यांसाठी होणार असून मानधन तत्त्वावर पगार दिला जाणार आहे. प्रतिमहिना दिल्या जाणार्‍या मानाधनाचं स्वरूप किमान 6 ते 25,000 रूपये इतके आहे.