दिल्लीतील भाजप कार्यालयात आज एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर काहीच क्षणात, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यावर कडाडून टीका केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी सर्वप्रथम टीका केल्या तर आता खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विटरवर लिहिले, "आज के शिवाजी नरेंद्र मोदी.. असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल.यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!"
आज के शिवाजी नरेंद्र मोदी..
असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत?हेच ते जयभगवान गोल.यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! pic.twitter.com/LxWySzDX7s
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी करण्यात आलेला उल्लेख हा वादाचा मुद्दा ठरला आहे.
इतकंच नव्हे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना देखील सवाल केला आहे. राऊत लिहितात, "जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का?"
जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते.महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीचया वंशजांना मान्य आहे का? pic.twitter.com/TwoVw45V2h
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
दरम्यान, ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक जय भगवान गोयल यांनी लिहिले असून ते भाजपचेच नेते आहेत. आणि मुख्य म्हणजे भाजपच्याच कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं असल्याने विविध स्तरानावरून त्यावर चर्चा होत आहे. सोशल मीडियावर देखील याबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.