Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती केंद्रात मोठी जबाबदारी पार पाडत असेल तर त्यात आनंदच आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (​Sharad Pawar) यांनी काढले आहेत. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता पवार बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार संजय राऊत यांनी भविष्यात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्राचे नेतृत्व करावे, असे उद्गार काढले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शांत, संयमी आणि आहेत. प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती वाटतात. त्यामुळे त्यांच्या शांत संयमी नेतृत्वाची भविष्यात भारतालाही गरज आहे. उद्धव ठाकरे हे त्यासाठी नक्कीच सक्षम असल्याचे उद्गार संजय राऊत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यातील कोरोनास्थिती आणि पूर आणि पर्जन्यवृष्टीची स्थिती पाहता आपला वाढदिवस कोणीही साजरा करुन नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. दरम्यान, हा धागा पकडत संजय राऊत यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांना मी 45 वर्षांपासून ओळखतो आहे. सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. भविष्यातही एक प्रकर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून राष्ट्राला जर नेतृत्व देण्याची गरज भासली तर ती पूर्ण करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार, 16 हजार कुटुंबांना करणार जीवनावश्यक मदत- शरद पवार)

दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानाबाबत शरद पवार यांना विचारले असता, जर महाराष्ट्रातील कोणी व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि त्यांना जर लोकांचे समर्थन मिळत असेल तर त्यात आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

राज्यात सध्या पूरस्थिती आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी, अद्यापही मदतकार्य सुरु आहे. अशा स्थितीत राजकीय नेत्यांनी त्या परिसरात दौरे काढून यंत्रणेवर अधिक भार टाकू नये असे अवाहन शरद पवार यांनी या वेळी केले.