शिवसेना खासदार संजय राऊतांनी हटके ट्विट च्या माध्यमातून दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा
Sanjay Raut And Nagpanchami (Photo Credits: PTI/Twitter)

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात नागपंचमीचा (Nag Panchami) सण साजरा केला जात आहे. श्रावणात (Shravan) येणा-या या पहिल्या सणाच्या सर्व देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. मग यात राजकीय मंडळी कसे बरे मागे राहतील. म्हणूनच आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या अनोख्या शैलीत सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या वर सतत टीका करणा-या लोकांना खोचकपणे टोला लगावला आहे.

'साप तर उगाच बदनाम आहेत. मला तर माणसं डसतात' असं त्यांनी पोस्ट करत सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Nag Panchami 2020: सांगली जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या 'बत्तीस शिराळा' गावातील नागपंचमी सणाबद्दल काही खास गोष्टी!

पाहा ट्विट:

राजकारण म्हटलं की हेवेदावे, टीका, फटकेबाजी, टोला यांसारख्या गोष्टी योगायोगाने आल्याच. मात्र सणाच्या शुभेच्छा देत अशा अंदाजात आपल्या वर टीका करण्याची पद्धत संजय राऊत यांनी आज आजमावून पाहिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दै. सामनाचे संपादक, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोरोना व्हायरस संकटात आवश्यक सल्ला आणि उपाययोजना आम्ही मागितल्या होता. परंतू, 'त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात', असा टोलाही ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला.