शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.रोज एखादी पत्रकार परिषद घेत ते भाजप पक्ष किंवा नेत्यानावर टीका करत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. आणि शिवसेना सत्ता स्थापनेच्या निर्णायक काळीच त्यांना रुग्णालयात (Sanjay Raut hospitalised) दाखल करण्यात आले आहे. त्यांना नुकतेच लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
मागील काही दिवस चालू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना विश्रांती मिळत नव्हती. यामुळे तब्येतीवर येणार ताण वाढत गेला. आता मात्र डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिलं आहे. आणि याचमुळे पुढचे दोन दिवस संजय राऊत कोणालाही भेटू शकणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल: निलेश राणे
संजय राऊत यांच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या सत्तास्थापनेच्या (Maharashtra Government Formation) दृष्टीने पाऊलं उचलत आहेत. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.